आशिष अंबाडे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, दि.27 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डोंगरे, फिनिक्स करिअर मार्गदर्शन केंद्राचे संचालक नितेश कराळे, उद्योग अधिकारी श्रीमती देठे, उदयनफ्याब सिग्नेचर कंपनीचे संचालक रोहन भामकर, गणराज व्यक्तिमत्व विकास केंद्राचे संचालक सुरेश गणराज, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी कौशल्याचा उपयोग फक्त नोकरीकरीताच नव्हे तर स्वयंरोजगारासाठी करुन एक यशस्वी उद्योजक बनावे. आपल्या उद्योगात इतर रोजगाराची संधी देऊन देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावावा. स्वत: आत्मसात केलेल्या कौशल्याचे ज्ञान इतरांना द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपस्थितांना केले. दुर्गूणांची वजाबाकी म्हणजे व्यक्तिमत्व विकास व सद्गुणाची बेरीज म्हणजे कौशल्य विकास आहे, असे प्रशांत डोंगरे यांनी सांगितले. नितेश कराळे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्पर्धा परिक्षेसोबत उद्योजकतेकडे सुध्दा वळावे, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना व कामाची लाज बाळगू नका, असे प्रतिपादन केले.यावेळी श्रीमती देठे, रोहन भामकर, सुरेश गणराज यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निता औघड यांनी केले. कार्यक्रमाला रोजगार अधिकारी रुपसिंग ठाकूर, महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो रुपेश रामगडे, अतुल वर्हेकर, शितल खुणे, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…