श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडावा लागेल? आमच्या पिढीने शिकायचं नाही का? असं थेट सवालाचे पत्र जायभाय वाडी येथील विद्यार्थ्यांने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहे.
अगोदरच ग्रामीण भागात शिक्षणाचे हाल बेहाल असताना राज्यात सरकारकडून मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे गाव खेड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संतप्त आहे. त्यामुळे सरकारवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. हे शिंदे आणि फडणवीस सरकार शिक्षण विरोधी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
राज्यातील ज्या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे चौथीपर्यंत असलेली डोंगरात बसलेल्या जायभाय वाडीची शाळा देखील बंद होणार असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे या शाळेचा विद्यार्थी समाधान बाबासाहेब जायभाये याने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच पत्र लिहित आपल्या भावना मांडल्या. आम्ही ऊसतोड कामगारांची मूल असून इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचं विद्यार्थ्याने या पत्रात म्हटलंय. हे पत्र सध्या सोशल माध्यमात देखील व्हायरल झालंय माझं गाव जायभायवाडी डोंगर भागात असून इथं चौथीपर्यंत शिक्षण घेता येतं. गावातून इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर पाच ते सात किलोमीटर चालत डोंगर चढ उतार करत जावं लागतं. पावसाळ्यात जाणे येण्या साठी मोठा अडथळा होतो. आई वडील सहा महिने ऊस तोडणीला जातात अशा परीस्थीती मध्ये आम्ही शिकायचं कसं? आमची पिढी शिक्षणा पासून वंचित ठेवायची का? मोठा झाल्यानंतर मी ही ऊस तोडायचा का?असा सवाल या विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…