प्रशांत जगताप, संपादक
नागपूर,दि.18 ऑक्टो:- स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय महाल नागपूर येथे आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलासाठी महत्वपूर्ण असलेल्या विविध विषयाबाबत मार्गदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अतंर्गत “महिला कायदे विषयक” मार्गदर्शन करण्यात आले, त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रतिभा भूतांगे मॅडम अध्यक्ष, नितू गजभिये मॅडम प्रमुख मार्गदर्शक, डॉ. महेश नरड़, आणि ललिता तालेवार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या यांनी वस्तीतील महिलानां घरेलू हिंसाचार, दिवाळीला मिळणारा बोनस, मैटरनिटी लिव तसेच आर्टिकल 21 अ या अंतर्गत मिळणारे 6 ते 14 वयोगटातिल मुलांना असलेले मोफत व सक्तीचे शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. सोबतच आपले हक्क व कर्तव्य कसे बजावले गेली पाहिजे, या सर्व योजनेची माहिती यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्वांना दिली.
या कार्यक्रमाच्या समारोपानंतर लगेच सर्वांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी यावेळी अभिप्राय अभियान राबविण्यात आले होते. यावेळी सर्व तरुणी, महिला आणि वृद्ध महिलांनी आपला अभिप्राय एका चार्ट पेपरवर लिहून आपली मते त्यात लिहली व त्यावर आपली स्वाक्षरी करून हे याभियान यशस्वी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय, महाल, नागपुर यांच्या कडून सिरस पेठ येथे करण्यात आले होते. यावेळी अश्विनी अहिरकर, प्राची भैसारे, गौरी देउळकर, दिव्या सांगोळे, पायल कुमरे, सोनू सडमके, अंजली कुडयामी, माधुरी कुळसंगे, सोनाली कसेंडी, करिश्मा तोडसाम, सागरास गावळे, अंगनवाडी सेविका सुवर्णा डोंगरे, चंदा आदमे अरुण निखाडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी अहिरकर यांनी केलं तर सर्व मान्यवरांचे आभार पायल कुमरे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी आणि महिला उपस्थित होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…