देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर/हिंगणा:-आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा हिंगणा तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा भान्सुली येथे सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात एकुण 102 मुला मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 5 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळल्या.
या शिबिरात मुख्याध्यापिका मीना संजय रघाटाटे व शिक्षक उपस्थित होते.
या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील . शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे,विद्या कुळसंगे, तेजस्विनी आत्राम यांनी सहकार्य केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…