लाईनमन दीपक पेंदाम यांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने आकस्मिक मृत्‍यु, पोभुर्णा येथील घटना.

मंत्री मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन केलेली ५ लाख रूपयांची मागणी मान्‍य.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभुर्णा:- तालुक्‍यातील चेक हत्‍तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्‍ये कार्यरत असणारे वायरमन श्री. दीपक पेंदाम हे विद्युत दुरूस्‍तीचे काम करीत असतांना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्‍यामुळे विजेच्‍या धक्‍क्‍याने त्‍यांचा आकस्मिक मृत्‍यु झाला. त्‍यांच्‍या मागे त्‍यांची पत्‍नी व तीन व दिड वर्षीय दोन मुली आहेत व त्‍या दोन्‍ही मुली दिव्‍यांग आहेत. क्षेत्राचे आमदार व वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या दुर्देवी घटनेबद्दल तिव्र शोक व्‍यक्‍त केला असून या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश महावितरण कंपनीच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांना दिले आहेत. त्‍याच बरोबर त्‍यांच्‍या पश्‍चात त्‍यांच्‍या कुटूंबियांची परिस्‍थीती अतिशय हलाखीची झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन ५ लाख रूपयांची मदत मिळावी अशी लेखी विनंती मा. मुख्‍यमंत्र्यांना केली आहे. त्‍याचबरोबर ना. मुनगंटीवार यांनी मा. मुख्‍यमंत्र्यांशी दुरध्‍वनीवरून सुध्‍दा चर्चा केली आहे व मा. मुख्‍यमंत्र्यांनी ही मागणी ताबडतोब मान्‍य केली असल्‍याचे ना. मुनगंटीवार म्‍हणाले.

अशा प्रकारच्‍या घटना भविष्‍यात घडू नये याची काळजी महावितरण कंपनीच्‍या अधिका-यांनी घ्‍यावी असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले. अपघातानंतर भाजपा नेत्‍या व जिल्हातील महिला आघाडीच्‍या अध्‍यक्षा अल्‍का आत्राम, अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, बंडू बुरांडे, वैभव पिंपळशेंडे, श्री. सातपुते यांनी घटनास्‍थळावरून पुढील सर्व मदत केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

अल्लीपुर येथे शेतकरी शंकरपट, कृषी प्रदर्शनीला खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची भेट.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…

3 hours ago

अभिनव विचार मंचा तर्फे हिंगणघाट येथे स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा म्हणून साजरा.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…

4 hours ago

युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे: स्वामी ग्यानगम्यानंद

भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

4 hours ago

चंद्रपूर: लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजाराची लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…

15 hours ago

नागपूरात नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जीव वाचला पण नाक चिरल्या गेले.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…

16 hours ago

आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !* *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.

*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…

17 hours ago