मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- सर्विकडे दिवाळीचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरटे पण सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. या दिवाळीच्या उत्सवात चोरट्यांचाही उच्छाद पहायला मिळतो. अनेक जण घर बंद करुन गावी जातात. काही जण खरेदीसाठी जातात तर काही जण लक्ष्मीपूजनासाठी आपल्या घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम पुजेसाठी बाहेर काढतात. या सर्व काळात चोरीच्या घटना सर्वत्र घडतात. त्यामुळे यासंदर्भात नाशिक पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळी सणात असणाऱ्या लक्ष्मीपूजन या दिवशी आपण सर्वजण घरातील दागदागिन्यांची व रोख रक्कमेची पूजा करण्याकरीता सर्व दागिने व रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढून पूजा करत असतात तसेच या दिवशी लक्ष्मी घरी येते म्हणून घराची सर्व दरवाजे खिडक्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवल्या जातात याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे इसम आपल्या घरातील उघड्या खिडकीतून दरवाजातून सदरचे दागदागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सर्व नागरिकांना पोलिसांकडून सतर्क करण्यात येते की ,आपले दाग दागिने ,रोख रक्कम पूजा झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे व घराची दारे व खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या जेणेकरून संधीसाधू चोरांना चोरी करता येणार नाही. तसेच दिवाळी सण करता अनेक नागरिक हे गावी जात असतात त्यामुळे बंद घराचे निरीक्षण करून काही संधी साधू चोरटे घरफोडी करून आपले दाग दागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व नागरिकांनी गावी जात असताना आपल्या बंद घराकडे शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे तसेच आपल्या किमती वस्तू दागदागिने रोख रक्कम सोबत घेऊन जावी जेणेकरून आपल्या बंद घराची घरफोडी होणार नाही. सतर्क राहा, सुरक्षित रहा, असे नाशिक पोलिसांनी नागरिकांना सांगितले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…