मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
विदर्भ:- राज्यात हर रोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनांमुळे मान खाली घावली लागते. पण आता या उभ्या महाराष्ट्रात एक नवीन धक्कादायक संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील महिला आणि मुलींच्या लापता होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात 840 महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.
पुणे पाठोपाठ आता विदर्भातील अमरावती जिल्ह्यातून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात तब्बल 272 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर अमरावती विभागातला हा आकडा तब्बल 812 इतका आहे. अमरावती विभागात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
गेल्या तीन महिन्यात महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचा आकडा हा धक्कादायक आहे. महाराष्ट्रामध्ये महिला आणि तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे वडील पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणाऱ्या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणे शक्य नाही.
यापैकी काही तरुणी आणि महिला घरी परतल्या असतील. काही पळून गेल्यानंतर लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलांसोबत लग्न लावून दिले असेल. पण ज्या मुली व महिला घरी परतल्याच नाही त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नाही. अमरावती जिल्ह्यात मे, जून, जुलै या 3 महिन्यात ग्रामीण भागात 175 तर शहरी भागात 97 अशा 272 महिला व तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये विविध कारणं समोर येत आहेत. पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घर सोडून जाणे ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहे. मात्र त्यामध्ये 50 टक्के महिला परत आल्याची माहिती अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली. 50 टक्के महिला परत आल्या असत्या तरी अजूनही 50 टक्के महिला बेपत्ता आहेत. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातून काही महिलांचा मानवी तस्करीसाठी सुद्धा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी वेगळे पथक करून महिलांचा तपास करावा, अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्या यांनी केली आहे. जिल्ह्यानुसार बेपत्ता झालेल्या महिला व मुलींची संख्या (गेल्या तीन महिन्यांतली) : बुलढाणा 170, अकोला 103, अमरावती 272, वाशीम 76, यवतमाळ 194 अशी आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…