बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला ग्रामस्थांची लक्षणिय उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव म्हणून ओळख असलेल्या बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत जनसंवाद साधत त्यांच्या गावातील प्रमुख समस्या जाणून घेतल्या. यावेळी बारसेवाडा सह परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी जनसंवादाला उपस्थित राहून माजी आमदार दिपक आत्राम यांच्यापुढे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य, सिंचन, रस्ते, वनहक्के दावे, शिक्षण, रोजगार असे महत्वपूर्ण समस्या मांडल्या असता माजी आमदार आत्राम यांनी बारसेवाडा व परिसरातील गावांमधील समस्या टप्प्याटप्प्याने का होईना पण आपण प्रामाणिकपणे सोडविण्याचे प्रयत्न करू व समस्यांची सोडवणूकि साठी सरकारकडेही पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला बारसेवाडा येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके, पोलीस पाटील लालूजी मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी, तुळशीराम हलामी, श्यामराव मडावी, विलास तिम्मा, देवानंद पुंगाटी, सावित्री आतलामी, ताराबाई तिम्मा, सरिता वाचामी, वैशाली पुंगाटी, तेजराव पोई, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी प.स.सदस्य रमेश तोरे,माजी सरपंच विजय कुसनाके, संदीप बडगे, सुरेंद्र वैरागडे, तुषार वैरागडे, अजित कुलयेटी, किरण भांडेकर, गणेश मडावी आदि मान्यवरांसह जनसंवादाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago