जी.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मेटीगुड्ड्म येतील नागरिकांशी केली चर्चा; दिवाळी निमित्याने महिलाना साड़ी वितरण.

गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- तालुका मुख्यालयापासून ७० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून ज़िम्मलगटा पासून १८ कि.मि. अंतरावर असलेले देचली पेठा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गांवात स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही. या भागात अनेक मूलभूत सुविधा पण पोहचल्या नाही. त्यामुळे अनेक समस्या आज आवासुन उभ्या आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत, पुल, विज नाहीत, पिण्याचं पाण्याचा समस्या मात्र या कडे शासन प्रशासन कडून दुर्लक्ष केले जात आहे. काल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर परिसरात दौर करून मेटीगुड्ड्म येते सभा घेवुन गांवात नागरिकांशी सखोल अशी चर्चा केली.

या गांवात निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत या परिसराला लागून नदी आहे त्यामुळे याठिकानी लिफ्ट ऐरीगेशन झाल्यास या परिसरातील शेतकरी सूजलम-सूपलम होतील, तसेच या परिसरात धानाची शेती जास्त प्रमाणात करत असतात मात्र या ठिकाणी या हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र जिम्मलगटा या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना या परिसरातून धान नेत असताना आर्थिक व मानसिक त्रास सहन करवा लागतो त्यामुळे धान खरेदी केंद्र देचलीपेठा येतंच सुरू करण्यात यावी अशी विनंती केली असून सदर धान खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सोबत चर्चा करू असे सांगितले. यावेळी नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली. असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यानंतर दिवाळी असल्याने दिवाळीच्या शुभेच्छा देत महिलांना फराळ व साड़ी भेट देण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी गाव पाटील श्री. गोसाई वेलादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, सरपंचा सौ. शांताबाई सिडाम, माजी सरपंचा मडावी, माजी सरपंच हंनमंतू सिडाम, ग्रा.प. सदस्या कु. यशोदा पोरतेट, नीलाताई सड़मेक, सत्यम नीलम, रामया मूलकरी, शिवराम पूल्लूरी, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच श्री. संजय पोरतेट, कार्तिक तोगम, नरेंद्र गरगम आदि मंचावर उपस्थित होते. सभेच्या संचालन व प्रस्ताविक श्री. डॉ. एस.नैताम यांनी केली तर आभारी प्रदर्शन श्री.भीमराव मडावी यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वर्धा: नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहिम, उपक्रमाचे शिबिरे आयोजित करुन सुशासन सप्ताह साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…

10 mins ago

सोनू करोसिया यांची अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत वर्धा जिल्हा महासचिव पदी नियुक्ती.

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…

14 mins ago

चंद्रपूर: काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा: गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेध.

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…

1 hour ago

पारिघा वेल्फेअर फाउंडेशन नाशिक व महिला बाल विकास संयुक्त विद्यामाने लिंग आधारित हिंसाचार जनजागृती अभियान.

उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 23 डिसेंबर रोजी पारिघा…

1 hour ago

ब्लॅक लेडी फिल्म प्रोडक्शन हाऊस मुंबई ब्रांच हिंगणघाटचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिनगंघाट:- 21 डिसेंबर रोजी ब्लॅक लेडी…

2 hours ago