पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे दि. २२/१०/२०२२ रोजी आरोपी यांनी आपआपसात संगनमत करून फिर्यादी याचा भाऊ नामे इंजमाम जुबेर इद्रीसी वय २२ रा दरबार बेकरी येरवडा पुणे यास लोहगाव व वाघोली परिसरात फिरवून त्यास जुन्या भांडणाचे कारणावरुन हत्याराने मारहाण करून येरवडा परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिले. सदरच्या इसमास गंभीर जखम झालेमुळे मयत झाला म्हणून येरवडा पो स्टे गु.र.नं ५०० / २०२२ भादवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोनि गुन्हे यांनी तपास पथकाला
सुचना दिल्या. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, पोअं अगजद शेख, अनिल शिंदे व राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील आरोपी नामे शहानवाज शेख हा इराणी मार्केट जवळ गाडीतळ येरवडा पुणे येथे थांबला आहे. तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावून आरोपीस सापळा रचून शिताफीने पकडले त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शहानवाज शब्बीर शेख वय २२ वर्षे रा. टिंगरेनगर पुणे असे असल्याचे सांगितले..
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन शहानवाज शेख व त्याचे दोन साथीदार असे आम्ही तिघांनी मिळून पट्टा, दगड, काचेच्या बाटलीने मारहाण करुन खून केला आहे असे सांगून गुन्हा कबूल केला आहे. सदर आरोपीस दि. २३/१०/२०१२ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि, गुन्हे उत्तम चक्रे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोबाळे, समोकी प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, पौना अमजद शेख, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे पोअ अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…