राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- राज्यभर पावसाने थैमान घातले असून आता प्रस्तावित महाराष्ट्र-तेलंगणा मार्ग नागरिकांनसाठी मरणवाट ठरला आहे. एकतर मार्गाचे बांधकाम सूरू आहे. दुसरीकडे मार्गात शेकडो खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी मार्ग उखळला आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठीच कसरत करावी लागत आहे.
चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुका महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर वसला आहे. महाराष्ट्र-तेलंगणाची सिमा तालुक्याला लागून आहे. गोंडपिपरी-सिरपुर हा प्रस्तावित राज्यमार्ग आहे. या मार्गाचे बांधकाम सूरू आहे. मात्र रस्त्याचे बांधकाम खूप संथगतीने सूरू असलेल्या बांधकामाचा फटका मोठ्या प्रमाणात वाहनधारकाना बसत आहे. या मार्गात शेकडो खड्डे पडले आहेत. रस्त्यात गड्डे आहे की, गड्ड्यात रस्त्ये आहे? हे समजायला येत नाही. अनेक ठिकाणी मार्ग उखळला आहे. तर मार्गावरील पुलाचे बांधकाम रखळले आहे. परिणामी या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघात घडले आहेत. दरम्यान मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवाश्यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…