शुभम ढवळे, मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम:- जिल्हातील मालेगावमधील नाना मुंदडा शाळेत विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाच्या खिचडीचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी तर संतापजनक प्रकार समोर आला असून खिचडीमध्ये आळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी गरीब यांच्या विद्यार्थ्यांनसाठी सकस आहार मिळावा यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील नाना मुंदडा शाळेत चक्क लहान मुलाच्या खिचडीत अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकामधून करण्यात येत आहे. संतापजनक बाब म्हणजे ही खिचडी काही विद्यार्थ्यांनी खाल्ली देखील. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असता पालकांनी जाब विचारण्यासाठी शाळा गाठली.
वाशिम जिल्हातील मालेगावमधील नाना मुंदडा शाळेत विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाच्या खिचडीचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी तर धक्कादायक प्रकार घडला असून खिचडीमध्ये अळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. यासंबंधितचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. संबंधित प्रकार पालकांना समजल्यानंतर पालकांनी शाळा गाठत शाळेतील शिक्षकांना याप्रकरणी जाब विचारला असता सुरूवातीला कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, यानंतर असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही पालकांना देण्यात आली. घडलेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरूच झाला आहे.
खिचडीमध्ये अळ्या निघून दोन ते तीन दिवस उलटूनही शिक्षण विभागाने याप्रकरणी साधी चाैकशी ही न केल्याने पालकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना खिचडीमधून चक्क गाळ्या देण्यात आल्या. मात्र, तरीही याप्रकरणाकडे शिक्षण विभागाने गांर्भियाने न घेता घडलेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत, मात्र, शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाळेचे मुख्याधापक सुनील राठी म्हणाले की, यानंतर असा प्रकार घडणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच स्वयंपाक घराची देखील पाहणी करून सुचना दिल्या आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…