गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मदत करण्याचा आरोपखाली डॉक्टरसह 3 नक्षल समर्थकांना अटक.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:-
गडचिरोली येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केद्राच्या एमबीबीएस डॉक्टर पवन उईकेचा समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे (UAPA) या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना समर्थनात बॅनर बांधत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या हाती लागली. गुप्त पद्धतीने पोलीस विभागाचे काही कर्मचारी जंगलात लपून याची माहिती घेत होते. कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेला एक एमबीबीएस डॉक्टरसह तीन आरोपींना अटक करण्यात आली. एकूण चार आरोपींना दिसून आले होते. पोलीस पथक गडचिरोली यांनी ही अटक केली.

गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवादाची दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात किंवा रस्त्याच्या अलीकडे – पलीकडे लावत असतात. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस अलर्ट राहून प्रत्येक भागात ऑपरेशन राबवत होते. ऑपरेशन राबवित असताना बॅनर लावण्यात सहभागी होते. यावेळी त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

अहेरी तालुक्यातील कमलापूर हा भाग नक्षलवाद्यांचा माहेरघर म्हणून ओळखला जातो. या घटनेमुळं चांगलीच खळबळ उडाली. डॉक्टर स्वखुशीने हे सारे करत होता की, त्याच्यावर दबाव होता, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. नक्षली दरवर्षी नक्षल सप्ताह साजरा करतात. अशावेळी नक्षली कारवायांना गती येते. अशातच बॅनर लावताना हे तिघे सापडले आहेत. पोलिसांना आता याची पाळेमुळे खोदून काढावी लागतील. कारण नक्षली सप्ताहावेळी नक्षलवादी हे अधिक सक्रिय होतात.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

8 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

19 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

20 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

20 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

20 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

20 hours ago