✒️लेखक प्रशांत जगताप
आज संपूर्ण विश्वात मैत्री दिवस साजरा करण्यात येत आहे. अनेक मित्र मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून आपली मैत्री अशीच आजन्म जपावी म्हणून वचन देत आहे. महाराष्ट्र संदेश न्युज पण आपल्या मित्रा सारख्या वाचक वर्गाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.
या जगात आपण जेव्हा जन्म घेतो त्यानंतर आपल्याला आपल्या परिवारातील अनेक नाती मिळतात. पण काही नाही आपण स्वतः तयार करतो ती नात म्हणजे “मैत्री” ते आपण आपल्या स्वतःच्या विश्वासावर, काळजी, आपुलकी प्रेम यामुळे निर्माण होते. आज जळन घळनच्या दुनियेत प्रत्येक नात हे काही तरी कारण असल्यामुळे निर्माण होत असल्याचे दिसून येते, पण जे नात हृदयाच्या स्पंदणातून निर्माण होते ते चिरकाल पर्यंत टिकून राहते.
ओढ्यातून वाहणा-या पाण्यासारखी शुभ्र, निर्मळ, आणि पारदर्शक मैत्री असावी.
कधी अडचणी च्या वेळी मित्रांची साथ न सोडणा-या सारखी मैत्री असावी.
कधी प्रेमामध्ये हरल्या नंतर घनदाट अंधारामध्ये हरवलेल्या मनाला देखील काजव्याच्या प्रकाशाने प्रसन्नित करणारी मैत्री असावी.
प्रत्येक आईच्या हृदयामध्ये आणि करुणेचा नेत्रांमध्ये सामाविलेल्या अथांग करूणाने भरलेली मैत्री असावी.
दुःखाच्या वाळवंटामध्ये देखील आनंदाचा पाझर फोडणारी मैत्री असावी.
मित्रांच्या मनातील रिक्त जागेमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी मैत्री असावी.
सोबत असताना कधी कधी रडता रडता हसवणारी, तर कधी दूर गेल्यावर त्याच मित्र आणि मैत्रिणीच्या आठवणी मध्ये हसता हसता रडवणारी अशी घट्ट मैत्री असावी.”
ज्या व्यक्तीशी बोलताना आपण मनमोकळे पणाने बोलू शकतो. बोलताना आपल्या मनावर कोणतेही दडपण नसणे. त्याला किंवा तिला काय वाटेल, अशी शंका मनात निर्माण न होणे. इतक्या मनमोकळे पणाने आपण त्याच्याबरोबर बोलणे, सुख दुःखात साथ न सोडणे, तिलाच खरी मैत्री असे म्हटले जाते.
मैत्रीचे नाते हे पाण्यासारखे निर्मळ आणि स्वच्छ असावं. त्यात कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा नसाव्यात व्यवहार तर मुळीच नसावा. काही लोकं कामापुरती संबंध जोडतात. व त्याला मैत्रीचे नाव देतात. ती खरी मैत्री मुळीच नसते.
कारण ज्या दिवशी तुमची गरज संपते, त्या दिवशी याची मैत्री सुध्दा संपते. म्हणजे, गुळ असते तिथे माश्या असतात. गुळ संपला की माश्या उडून जातात. याचा अर्थ असा की, पैसा असेल तर लोकं टिकून राहतात, तोच पैसा संपला की ती दूर जातात. हे मी अगदी जवळून पाहिलं आहे.
मैत्री ही योग्य दिशा दाखवणारी हवी. कोणतेही संकट आले तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे त्या संकटातून वाचवणारी हवी. मैत्रीमुळे आपले चांगले व्यक्तिमत्व घडले पाहिजे. कारण मैत्री हि आपल्याला सुधरवणारी पण आणि बिघडवणारी पण असते.
तर आपले मित्र आणि मैत्रिण हे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आधार देणारेच हवेत. जे जर आपली अब्रू काढत असतील, तर ते आपले मित्र कधीच नसतात. ते फक्त आणि फक्त स्वार्थी आणि जळावू वृत्तीचे लोकं असतात. असं माझं मत आहे, अश्या लोकांपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यातच तुमचे खरे हित आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…