30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर वधूचा विवाह सोहळा रीती रिवाजाने धुमधडक्यात पार पडला.

प्रशांत जगताप विशेष प्रतिनिधी
कर्नाटक:-
येथून एक अनोखी बातमी समोर येत आहे. 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एका वर वधूचा विवाह सोहळा नुसताच रीती रिवाजा नुसार मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे.

ही अनोखी घटना आहे कर्नाटक मधील, तुम्हाला आश्चर्याने एकच प्रश्न पडेल, 30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर आणि वधुच लग्न हे कसं शक्य आहे. पण हे खरंय आणि हि एक कर्नाटक राज्यातील प्रथा आहे. दक्षिणा कन्नडा या प्रथेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मादरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचं दुसऱ्या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जातं. मृत नवजाताच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर म्हणजे ते तरुण्यवस्थेत आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पाडला जातो.

विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यास वधु वर स्वतः हा उपस्थित नसले तरी त्यांच्या परिवारातील लोक, गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात आणि अगदी वधू वर हयात असल्यासारखे विवाह सोहळा पार पडतो. यात एक विशेष अट आहे ती म्हणजे या या विवाह सोहळ्यात लहान मुलांना प्रवेश नसतो.

भारत हा देश पूर्वी पासून अनेक प्रथा, परंपरा, रूढीने भरलेला देश आहे. आज आपण 21 व्या शतकात असलो तरी अशा परंपरा समोर चालवत आहों. 2 मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक आणि चिंताजनक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणावर जपली जात आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

14 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago