15 वर्षाच्या मुलीच्या अंगात देवी आली, मग 7 वर्षाच्या बहिणीचे तलवारीने मुंडके छाटले.

MSN क्राईम रिपोर्टर
राजस्थान:-
राजस्थान राज्यातील डुंगरपूर जिल्ह्यातून एक भयंकर धक्का देणारी माहिती समोर आली आहे. श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धेचे भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या 7 वर्षाच्या चुलत बहिणीच्या तलवारीने गळा कापून हत्या केल्याची घटना डुंगरपूर जिल्ह्यातील चितरी पोलीस स्टेशन अंतर्गत झिंझवा फाला गावात घडली आहे.

एका अलपवयीन मुलीने आपल्या अंगात देवी आल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत तिने नगी तलवार घेऊन घराबाहेर मोठ्या प्रमाणात तमाशा केला. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेने ग्रशीत असलेल्या या मुलीने देवी अंगात आल्याचे सर्वांना सांगितल यादरम्यान मुलीने तिच्या 7 वर्षीय चुलत बहिणीच्या मानेवर तलवारीने वार करून तिची हत्या केली. हत्ये नंतर तिने या आपल्या वडील आणि काका वर पण हल्ला केला. या हल्ल्यात वडील आणि काकाही जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे.

काय आहे ही घटना ?
पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या झिंझवा फाला गावात रविवारी रात्री दशा माता व्रत उत्सवादरम्यान एका 15 वर्षीय मुलीने आपल्या अंगात देवी आल्याचे सांगत तलवारीने गोंधळ घातला. तसेच तेथेच झोपलेल्या आपल्या 7 वर्षीय चुलत बहिणीवर तलवारीने वार करून तिची मान धडापासून वेगळी केली. हरियाली अमावस्येच्या दिवसापासून चितारी झिंझवा फाला येथील शंकरचा मुलगा रामजी डेंडोर यांच्या घरी दशामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दशामातेच्या पूजेचा कार्यक्रम रात्री आठ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यादरम्यान, शंकरच्या 15 वर्षीय मुलीने हातात नंग्या तलवार घेऊन लोकांना सांगितले की ती सर्वांना ठार करेल. असे म्हणत ती तलवार घेऊन घराच्या अंगणात धावू लागली, असे पोलीसानी सांगितले.

वडील शंकर आणि काका सुरेश यांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान मुलीने वडील आणि काकांवर तलवारीने वार केले. त्यामुळे दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. यादरम्यान सुरेशची 7 वर्षांची मुलगी पुष्पा ही त्याच घरात घरात झोपली होती. मुलगी तिच्याजवळ गेली आणि तिला ओढत घरातील दुसऱ्या खोलीत नेले आणि तलवारीने तिचा गळा कापला. घरच्यांनी कसेतरी घेराव घालून मुलीला पकडले. घटनेची माहिती मिळताच चितरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीला ताब्यात घेतले आहे. बांसवाडा येथून एसएफएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

9 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

9 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

10 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

10 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

10 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

11 hours ago