मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दिलेल्या पैशांचे काय केले याचा जाब आई-वडील विचारत असल्याने त्यांना आता काय उत्तर द्यायचे, या नैराश्येतून केटीएचएम महाविद्यालयातील टी.
वाय. बी. कॉमच्या विद्यार्थ्यांने वसतिगृहातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि.22 सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या वडिलांना ‘सॉरी’ असा मेसेज पाठवला. गौरव रमेश बोरसे वय 21, रा.डांगसौंदाणे, ता.बागलाण असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव हा केटीएचएम महाविद्यालयात टीबीबी कॉमच्या तिसर्या वर्षामध्ये होता. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये राहत होता. शिवाय, तो सीए असलेल्या मामांकडे पार्टटाईम नोकरीसुद्धा करत होता. सोमवारी रात्री १० वाजेदरम्यान वसतिगृहामधील मित्रासोबत त्याने जेवण केले. तो रुमध्ये एकटाच राहत होता. मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान त्याच्या रूमसमोरील मित्र इस्त्री मागण्यासाठी गौरवच्या रुमजवळ आला. त्यावेळी त्याला रूमचा दरवाजा बंद दिसला. शिवाय, त्याचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले. शेवटी मित्रांनी खिडकीच्या फटीतून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही बाब विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील प्रमुखांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता त्याने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. गौरवने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी नाशिक गाठले. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात त्याच्या आईसह कुटुंबियांनी हंबरडा फोडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.
सीसीटीव्हीच नाहीत
वसतिगृहात सुमारे 80 विद्यार्थी राहत असताना तेथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा का बसवण्यात आला नाही, याविषयी पोलिसांनी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड व वसतिगृहाचे प्रमुख डेर्ले यांच्याकडे विचारणा केली आहे. याविषयी त्यांना योग्य खुलासा करता आला नाही. तसेच वसतिगृहातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित होताच एका तासात 10 शिपायांनी संपूर्ण होस्टेल स्वच्छ केले.
महाविद्यालय चर्चेत
केटीएचएम महाविद्यालयात गत आठवड्यात दोन महाविद्यालयीन तरुणीमध्ये हाणामारी झाली होती. हाणामारीचा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा केटीएचएम महाविद्याल यातील २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे महाविद्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
यामुळे केली गौरवने आत्महत्या?
केटीएचएम महाविद्यालयाच्या वसतिगृहाची फी व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी रमेश बोरसे यांनी गौरवला काही दिवसांपूर्वी पैसे दिले होते. हे पैसे त्याने मित्रांसोबत पार्टी करण्यात उडवल्याचे त्याचे काही मित्र खासगीत सांगतात. गौरवच्या वडील फी भरल्याची पावती मागत होते. पैसे खर्च झाल्याने आणि वडील पावती मागत असल्याने तो तणावात होता मंगळवारी त्याला वडिलांनी पावती दाखवण्यास सांगितले होते.
रूममध्ये एकटाच असल्याने त्याने गळफास घेतला. गौरव वसतिगृहातील मेसमध्ये आठवड्यातून एकदाच जेवण करायचा. पुढील तपास पोलिस करत आहेत .
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…