चंद्रपूर जिल्ह्यात “मोहरमच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू.

हानिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:
जिल्ह्यात 31 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 दरम्यान मोहरम हा सण मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. 30 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

हे आहेत अधिकार :
मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 30 जुलैच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 9 ऑगस्ट 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरज येथील वालनेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) येथे होणाऱ्या आंदोलनाला सेवक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- येथील आरोग्य पंढरीला नाव लवकिक…

1 min ago

नागपूर ओयो होटेल पैराडाइस मध्ये देहव्यापार अड्डावर पोलिसांचा छापा, दोन मुलीची सुटका, एक आरोपी अटक.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील रमाई नगर कपिल नगर…

9 mins ago

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

19 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago