विश्वास वाडे, चोपडा प्रतिनिधी
चोपडा:- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त नर्सरी, जूनियर केजी, सीनियर केजीचे विद्यार्थ्यी टिळकांच्या वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाले. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या या युगपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी शिक्षक, समाजसुधारक, क्रांतिकारक, पत्रकार, लेखक. अशा विविध भूमिकांमधून जनजागृती केली. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंगांविषयी ममता कपिल न्याती यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. टिळकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपले विचार मांडले. टिळकांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांचे सादरीकरण आपल्या वक्तृत्वातून करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेमध्ये राज्ञी मंगेश बाविस्कर आणि आरव नरेंद्र पाटील या नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी नर्सरीच्या गटात यश संपादन केले. स्पर्श महेश रायतोळे, निरुत्ती चक्रधर पाटील, ईश्वरी योगेश पाटील या ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी ज्युनिअर केजीच्या गटात यश संपादन केले. रुपेश पाटील, आराध्या पाटील, कृष्णाली पाटील आणि वेदिका पाटील या सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी सिनियर केजी च्या गटात यश संपादन केले.स्पर्धेचे परीक्षण सुचिता पाटील आणि प्राजक्ता सोनवणे यांनी केले. शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिशुगटाच्या कामिनी पाटील, माधुरी पाटील, वैशाली पाटील आणि जुईली ठाकरे या शिक्षिकांचे अनमोल सहकार्य लाभले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. कार्यक्रमासाठी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…