✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
हिंगणघाट:- महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थे मार्फत इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सोयी सुविधा दिल्या जातात. आज दिनांक 30 नोव्हेंबर रोज गुरुवारला पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने (महाज्योती) नागपूर मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप कार्यक्रमाचे आयोजन शिवसुमन मंगल कार्यालय हिंगणघाट येथे केले. यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील एकुण ६०१ विद्यार्थ्यांना खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्तिथीत मोफत टॅब वितरीत केले.
हिंगणघाट तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्याकरीता नक्कीच हा टॅब उपयुक्त ठरणार असून विद्यार्थ्यांनी या टॅबचा वापर सुयोग्य शिक्षणाकरिता करावा असं आव्हान करत या सर्व विद्यार्थाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, शहराध्यक्ष आशिष पर्बत, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.अनिता मावळे, कौशर अंजूम, महाज्योतीचे राज्य व्यवस्थापक कुणाल शिरसाठ, किरण वैद्य, नरेश युवनाथे, कवि इंगोले, सोनू पांडे, सुनील डोंगरे, शुभांगी डोंगरे, रविला आखाडे, नलिनी सयाम, शारदा पटेल, रवि रोहणकर, रवि बुरीले, अनिल गहरवार, देवा कुबडे, अतुल नंदागवळी, अक्षय थुटे, विक्की बारेकर, रजत भुरे, रसिका रोहणकर, राहूल दारूणकर, मुन्ना त्रिवेदी, अकींत त्रिवेदी, अमोल खंदार, ज्ञानेश्वर भागवते इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित कार्यक्रम पार पडले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…