संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण, मो 9923497800
खालील वृत्त या प्रमाणे आहे की अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस उपक्रम च्या माध्यमातून एक कुटुंब 5 झाड लावणे या संकल्पनेतून पियू कॉर्डिंनेटर अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उप्परवाही पवन कूनघाटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमी या सणाचे औचित्य साधून मौजा माथारा येथे पोलीस पाटील सुरेश चहारे, केशव काळे व सौ. शालू श्रीधर वैद्य यांचा वाढदिवस वृक्ष देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रश्नावली विचारण्यात आले व छोटसे प्रोत्साहन बक्षीस म्हणून छत्री देण्यात आली . कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार यांनी वृक्षारोपणा मुळे जैवविविधाता कशी राखता येईल याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले, तसेच प्रक्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर यांनी फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनाचा वापर तसेच रोड सेफ्टी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सेवा-सहकारी संस्था धोपटाळा चे अध्यक्ष अनिल डाखरे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जबूलवार, रुपेश गेडेकर, उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य मा सौ अल्काताई वैद्य, पोलीस पाटील सुरेश चहारे, धोपटाळा सेवा-सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल डाखरे, माजी.पोलीस पाटील गणपती झाडे, दिलीप वैद्य, नानाजी वैद्य, श्रीधर वैद्य, केशव काळे, बालाजी चहारे, परशुराम मडावी, हरिदास ठेंगणे, देविदास झाडे,बाबुराव परचाके, विनोद चहारे, सतीश ताजने, सौ शालू वैद्य,सौ सुमन मडावी तसेच बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…