राजुरा येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह अजुन ही सुरू नाही, शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
मो 9923497800

राजुरा:- आज चंद्रपूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष तथा ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाऊंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी प्रकल्प अधिकारी रोहन घुघे यांची भेट घेतली व राजुरा येथील वसतिगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह दरवर्षी दीड दोन महिने वसतीगृह सुरू केल्या जात नाही आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षण वाया जात असल्याने त्यांच्यात कमी पणाची भावना निर्माण होत आहे आणि याला कारणीभूत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी असून येत्या दोन दिवसात वसतिगृहात प्रवेश न दिल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे मेश्राम यांनी निवेदनातून कळविले आहे.

यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी वसतिगृहात राहण्याची सोय करणार असल्याची ग्वाही दिली. मात्र शासनाने अजूनही वसतिगृह सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचे मत व्यक्त कले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

9 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

10 hours ago