एसटीची दुचाकीला जबर धडक; महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी, बुटीबोरीच्या शनी मंदिराजवळील घटना


✒️प्रविण जगताप, हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

बुटीबोरी (नागपूर) :– बटिबोरी येथून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. हिंगणघाट येथून बाइकने आईला मामाच्या घरी नागपूर येथे घेऊन जात असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. यात आईचा मृत्यू झाला तर बाइकस्वार मुलगा जखमी झाला.

बुटीबोरीनजीकच्या शनी मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता हा अपघात घडला. कल्पना संजय वानखेडे (४२) असे मृत महिलेचे तर संकल्प वानखेडे (२०), रा. हनुमान वॉर्ड, हिंगणघाट, वर्धा असे जखमी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संकल्प हा आईला घेऊन हिंगणघाट येथून नागपूरला मामाकडे बाइक क्र. एमएच ३२ एजी ०१२० ने जात असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर बुटीबोरी येथील शनी मंदिरासमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. यात कल्पना याखाली पडल्या आणि बसच्या चाकाखाली आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संकल्प हा जखमी झाला. अपघात होताच एसटी चालक एसटी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, अमलदार भारत तायडे, युसूफ खान यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. जखमी संकल्पवर बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात एसटी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- लाच घेताना अनेकांना रंगेहाथ…

6 hours ago

पुष्पाबाई प्रल्याद वासनिक यांचं आजाराने दुःखद निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली…

16 hours ago

नागपूरात ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…

17 hours ago

जालना जिल्हा हादरला, होणाऱ्या नवऱ्याला धमकी देत जालना रेल्वे स्टेशन परिसरातील अंधारात भावी पत्नीवर अत्याचार.

रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…

19 hours ago

अपार नोंदणीविरोधात भ्रम पसरविण्यामागे मिशनरींचा हात.* *भाजप तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचा आरोप.

*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…

1 day ago

अपार नोंदणीविरोधात भ्रम पसरविण्यामागे मिशनरींचा हात.* *भाजप तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचा आरोप.

*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…

1 day ago