वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामिन प्रतिनिधी
राजुरा :-
देशात आज मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. जनता त्रस्त असून गरिबाच्या मोठे हाल होत आहे. त्यामुळे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस च्या वतीने तर गोंडपिपरी, कोरपना, जिवती येथे तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या महागाई विरोधात, बेरोजगारी व सैन्य भरतीच्या तरुणांना नुकसानकारक ठरणाऱ्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात तसेच जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जी. एस. टी च्या विरोधात एकदिवसीय धरणे आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अग्नीपथ योजना मागे घ्यावी, गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार हरिष गाडे यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. आमदार सुभाष धोटे सह काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. या आंदोलनात स्थानिक महिला, युवकांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश गुरणुले, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोकराव देशपांडे, माजी सभापती सदस्य कुंदा जेणेकर, मुमताज जावेद अब्दुल, निर्मला कुडमेथे, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, राजुरा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईरशाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव, शंकर गोनेलवार, नानाजी आदे, हरिचंद्र जूनघरे, सुधाकर उईके, अजय रेड्डी, भाग्यश्री आत्राम, श्यामराव कोटनाके, जंगू येडमे शंकर बोंकुर, अब्दुल जमीर, प्रभाकर येरणे, अविनाश जेनेकर, गोपाल बुरांडे, प्रणय लांडे, विनोद कावडे, उमेश गोरे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, शिवराम लांडे, रामभाऊ ढुमने, अमित टेकाम, जगदीश बुटले, पंढरी चंन्ने, आकेश चोथले, योगिता भोयर, ज्योती शेंडे, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर, जिवती येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, विठ्ठलराव थिपे, गणपत आडे, विजयराव बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह केंद्र सरकारचा निषेध करून जेलभरो आंदोलन करण्यात आले वाढती महागाई विरोधात कांग्रेस कार्यकर्तासह जेलभरो आंदोलन राजुरयात आंदोलन करण्यात आले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

19 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

20 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

20 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

21 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

21 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago