संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- सविस्तर वृत्त खलीलप्रमाणे राजुरा तालुका अंतरगाव ग्रामपंचायतीने दिनांक १२ ऑगस्ट रोजी ग्रामसेवकांच्या प्राथमिक नोटीस सूचीमधील ८ व्या व्यावसाय आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुरम या व्यक्तीला राजुरा अंतरगाव या मित्र कार्ड हाऊस (गठ्ठे) खेळणे सुरू करण्यास परवानगी देणे विषय ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी विषय सूचित केला आहे.
पेसा गावात अश्या प्रकारचा एखादा कार्ड क्लब सुरू करता येऊ शकतो काय? सभेला १०० लोकांना उपस्थित ठेवून रजिस्टर वर त्यांच्या सह्या नोंदवून त्यात कोणतेही ठराव पास करून घेता येईल काय ? तर याचे उत्तर नाही असेच आहे. कारण महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही कायद्याने श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब चालविण्याची परवानगी (लायसन्स) दिलेली असेल तरी देखील श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब सुरू करण्यासाठी परवानगी देणे हे पेसा नियमाला धरून नाही. जर हेच कार्ड क्लब (पत्ते खेळण्याचा क्लब) पेसा गावा व्यतिरिक्त दुसऱ्या नॉन पेसा गावात सुद्धा नागरिकांनी अश्या धंद्यांना परवानगी देणे मान्य नसते .
परंतु अंतरगाव(अन्नूर) हे गाव पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे नियमानुसार अशी कोणतीही विषय वस्तू जी अनुसूचित क्षेत्राच्या अधिकार कक्षेत येते आणि ती जर अनुसूचित जमातीच्या रूढी, प्रथा, परंपरा यांच्याशी सुसंगत नसेल तर ती देता येत नाही.
ग्रामसभेला ती परवानगी देने हा विषय आदिवासी समाजाच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीशी निगळीत नसून पत्ते खेळणे हा विषय आदिवासी समाजाच्या कोणत्याच परंपरेत बसत नाही. त्यामुळे १०० लोकांच्या ऐवजी २०० लोकांनी जरी ग्रामसभेला उपस्थित राहून सह्या केल्या तरी देखील ग्रामसभा श्रीनिवास गुर्रम यांना कार्ड क्लब सुरू करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. जर या मागणीला शासन परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी दिली आहे.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…
रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…