Categories: Uncategorized

भोयेगाव – कवठाळा- गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी.

Ø पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे नागरीकांना आवाहन.

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट :-
भोयेगाव- कवठाळा- गडचांदूर या मार्गावर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशिनरी ही खूप मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या -जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकेरी मार्गाने वाहतुक बंद पडल्यास संपूर्ण वाहतुक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

अवजड वाहतूकदारांनी गडचांदूरकडून चंद्रपूर येण्यासाठी गडचांदूर-राजुरा-बल्लारशा-चंद्रपूर या मार्गाचा वापर करावा. तसेच गडचांदूरकडून घुगुसकडे जाण्यासाठी गडचांदूर- आवाळपुर- गाडेगाव- कवठाळा- भोयेगाव -घुगुस या मार्गांचा वापर करता येईल. भोयगांवकडून गडचांदूरकडे जाण्यासाठी कवठाळा- गाडेगाव -आवाळपुर- गडचांदूर मार्ग उपलब्ध असल्याने कवठाळा ते गडचांदूर हा रस्ता जड वाहनांकरीता पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.-1, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम-33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, कवठाळा ते गडचांदूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरीता 30 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 यांचे पत्र प्राप्त झाल्याने सदर अधिसूचनेत दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. या निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

10 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

10 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

11 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

11 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

12 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

12 hours ago