राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो 951836817
पोंभुर्णा, 5 ऑगस्ट:- शहरातील महात्मा फुले चौकातील एका २९ वर्षीय युवकाने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना आज ५ ऑगस्ट रोजी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव अभय गुरुनुले असे असुन त्याच्या मृत्युने परीवारात व गावात शोककळा पसरली आहे. मृतक अभय हा मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता. आजारामुळे त्याचे स्वास्थ बिघडले होते. पोटाचे दुखणे असह्य झाल्याने त्याचे मानसिक नैराश्य वाढले होते. शुक्रवारी दुपारला त्याच्या पोटाचा त्रास वाढल्याने संध्याकाळच्या सुमारास घराला लागून असलेल्या विहिरीत उडी घेऊन अभयने आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले पण विहिर तुडुंब भरून असल्याने व गाळ असल्याने मृतदेहाला वर काढता आले नाही. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, आणि मुलगी असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…
रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…