मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिकमध्ये सध्या थंडीची शित लहर सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरा सह जिल्हा गाठरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सकाळ पासून बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असून ढगाळ वातावरणाने नाशिक शहरासह जिल्ह्याची नागरिक मोठ्या प्रमाणात बेजार झाले आहे. त्यात सूर्याचे दर्शन उशिराने होत असल्याची परिस्थिती आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमाना बरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली असून शीतलहरींमुळे दिवसाही नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकून लोक घराबाहेर पडत आहेत. दिवसभर स्वेटर आणि रात्री शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत.
थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरा थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला मात्र गेल्या दोन दिवसां पासून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे सलग दोन दिवस सकाळी किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत असला तरी दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवतो आहे उत्तर भारतात झालेल्या बुधवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने सूर्या चे दर्शनही उशिराने होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पर्यंत नाशिक मधील सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले होते 3 जानेवारीला कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असताना बुधवारी त्यात सहा अंशांची घसरण झाली त्यामुळे हे तापमान 24.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले गुरुवारी देखील कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले तर दिवसभर वाऱ्याचा वेगळी आठ किलोमीटर प्रति तास होता. गुरुवारी नाशिक मधील किमान तापमान 13.2 अंश तर कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आज शुक्रवारी हेच तापमान 16. 2 अंशावर आले आहे आहे. हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे.
सर्दी, खोकला वाढला…
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शिवाय दिवसादेखील हवेत प्रचंड गारवा जाणवत आहे. यामुळे शहरात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. हे बदलामुळे व्हायरल फिवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे आतांनी तापमानात घसरण होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यासाठी घराबाहेर पडताना उबदार कपडे, पाणी पिताना कोमट पाण्याचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…