मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आज कंत्राटी तत्त्वावर काम कामगाराचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. मिळाला तरी त्यात अर्धा भाग हा कंत्राटदाराच्या घशात जात आहे. त्यामुळे कामगार गरीब कंत्राटदार श्रीमंत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशेच प्रकरण अहेरी येथून समोर येत आहे.
अहेरी नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ५५ सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर काम करतात परंतु गेल्या २ महिन्यापासून त्यांचे वेतन कंत्राटदाराने न दिल्याने या सर्व कामगारावर सद्या उपासमारीची वेळ आली आहे. ह्याबाबत भाजपाचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज जाधव यांना एक निवेदन देत सफाई कामगारांचे २ महिन्याचे थकीत वेतन त्वरित मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी ५ जानेवारी पर्यंत थकित वेतन न दिल्यास सफाई कामगारांना सोबत घेवुन बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशाराही त्या निवेदनातुन दिला होता. परंतु ५ जानेवारी पर्यंत सफाई कामगारांना २ महिन्यांचे थकीत वेतन कंत्राटदाराने न दिल्याने आज सकाळ पासून अहेरी शहरात कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील संपूर्ण कचरा संकलन आणि साफ सफाई ठप्प झाल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे. मागण्या तातडीने पूर्ण झाले नाही तर समोर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ही सफाई कामगारांनी अहेरी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…