हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न !

पक्षाची विचारधारा आणि नेता यांच्यावरील निष्ठा महत्त्वाची : शब्बीर विद्रोही.


देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी जि नागपूर

हिंगणा:- येथे हिंगणा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की कार्यकर्त्यांची पक्षाची विचारधारा व पक्षातील नेत्यांवर निष्ठा असणे महत्त्वाचे आहे. तसेच पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवाव्या व त्यातून त्यांना समाधान प्राप्त करून द्याव तरच पक्ष संघटन हे सामान्य माणसापर्यंत पोहोचून मजबूत होतं. तसेच पुढे बोलताना विद्रोही म्हणाले ज्या लोकांना आपल्या नेत्यांवर निष्ठा नाही त्यांच्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दूरच राहावे. तर अध्यक्षीय भाषण करतेवेळी रमेशचंद्र बंग यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावागावात बूथ स्तरावर पक्षाची बांधणी करून पक्षाचे जाळे मजबूत करावे असे आवाहन केले.

यावेळी मंचकावर जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष श्याम बाबू गोमासे, जि. प. सदस्य रश्मी कोटगुले, वृंदा नागपुरे,नागपूर प.स.उपसभापती संजय चिकटे, हिंगणा प.स.उपसभापती सुषमा कावळे नागपूर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष संजय कुंटे युवक जिल्हाध्यक्ष आशिष पुंड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मिळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंगणा तालुका अध्यक्षपदी योगेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी लीलाधर दाभे, जिल्हा संघटन सचिव पदी सुशील दीक्षित, डिगडोह मंडळ अध्यक्षपदी प्रदीप कोटगुले, तर सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबाराव वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, प्रेम झाडे, राजेश जैस्वाल, महेश बंग, वसंतराव इखनकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अमजद शेख, श्याम मंडपे, प.स.सदस्य सुनील बोंदाडे, उमेश राजपूत, राजेंद्र उईके, अनुसया सोनवाणे, वैशाली कचोरे, पौर्णिमा दीक्षित, गटनेता गुणवंता चामाटे, नगरसेवक संकेत दीक्षित, दादाराव इटनकर, मेघा भगत, विशाखा लोणारे, प्रशांत सोमकुवर, नारायण डाखळे, बबलू सवाने, राजेंद्र गोतमारे, अरुण देवतळे, प्रेमलाल चौधरी, रामभाऊ महल्ले, युसूफ पठाण, रामचंद्र टेकाडे, सुरेश शेंडे, पुरुषोत्तम चौधरी, मुकेश पाल, मुकेश ढोमणे, रोशन खाडे, प्रभाकर लेकुरवाडे, बाबुलाल राठोड, सरपंच प्रेमलाल भलावी, दिनेश ढेंगरे, निलेश उईके, अनुप डाखळे, विलास वाघ, सुधाकर धामंदे, राजू हाडपे, सुरजलाल बोपचे, विजू मेश्राम, संतोष गव्हाळे, अशोक आंबूलकर दीपक वर्मा, मंगेश भांगे, रेखाताई कळसकर, गीता हरिनखेडे, मीना मेश्राम, रज्जु सोनुने, श्याम फलके सुहास कोहाड, लोमेश फलके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

18 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago