माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची आलापल्लीचे वन विभागाचे डीएफओ टोलीया यांच्याशी चर्चा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत खमनचेरु हा आदिवासी बहुल भाग असून हा भाग मोठ्या प्रमाणात माघास आहे. या भागाचा विकास कधी होणार ? की विकासाचे झुनझुने वाजवून फक्त परिसरातील नागरिकांचे मन बहलवणार आहे की काय? अहेरी खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. सीएमजीएसवाय च्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे चे काम सुरु करून जनेची मागणी पूर्ण करायला तयार असतांना वन विभागाचे काही कर्मचारीयांनी या कामाला अटकाव करून या रस्त्याचे बांधकाम रोकून धरले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत अहेरी येथील गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यानी वन अधिकारी डीएफओ यांना या बाबद विचारणा केली असता, अहेरी ते खमनचेरू येथे बांधण्यात येत असलेला रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या अख्त्यांरीत येत असल्याने वन विभागाने काम रोखले अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु आहे. जे रस्त्या मागील पन्नास वर्षांपासून असून अचानक पणे वन विभाच्या अख्त्यांरीत कसा काय येऊ शकतो? असा प्रश्न जनता करीत आहे. जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वन विभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्या पलीकडचे आहे. जनता हि वेळो वेळी वन विभाला मदत करत असते मात्र वन विभाग मात्र नागरिकांचे विकासकाम होऊ देत नाही हि मात्र चिंतेची बाबा आहे. लवकरच अहेरी ते खमनचेरू येथील रस्त्याचे काम होणार सुरु होणार असे यावेळी सांगण्यात आहे. त्यामुळे माजी जि.प अध्यक्ष अजय ककडालवार याच्या प्रयत्नाना यश आले आहे.
यावेळी उपस्थित सुनीता कुसनाके माजी जिल्हा परिषद सदस्य, अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, विलास सिडाम नगरपंचायत सदस्य, विलास गलबले नगरपंचायत सदस्य, शायलू मडावी सरपंच खमनचेरु, वंदना दुर्गे सदस्य महागाव व इतर कार्यकर्ते आलापल्ली वन विभागाच्या कार्यलयात जाऊन डीएफओ टोलिया यांच्या सोबत चर्चा करून अहेरी खमनचेरू रोडचे काम बंद असल्याबाबद चर्चा करून रोडचे काम तात्काळ काम सुरु करण्याकरीता चर्चा केले. त्यावेळी डीएफओ टोलिया यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना केली व कोणत्याही प्रकारचे काम बंद पाडू नये अशी सूचना करून रोड चे काम सुरु करण्याचे तोंडी आदेश आरएफओ ना दिले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…