शुल्लक कारणावरून पत्नीची हत्या करून मृतदेह पेटविला सोयाबीनच्या कुटारामध्ये यवतमाळ जिल्हातील खळबळ जनक घटना.

✒️यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जील्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उमरखेड तालुक्यातील माळआसोली शिवारात सोयाबीनच्या कुटारामध्ये जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली होती. या घटनेचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पत्नी शारीरिक संबंध ठेवायला विरोध करीत असल्याने संंतापलेल्या पतीने आपल्याच पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी सोयाबीनच्या कुटारामध्ये मृतदेह टाकून त्याला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केल्या हा सर्व प्रकार पोलिस तपासातून पुढे आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

प्राप्त माहितनुसार, उमरखेड तालुक्यातील माळआसोली शिवारातील गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका शेतात सोयाबीनच्या कुटारामध्ये जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रदीप पाडवी, पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके, बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. प्रेताची पाहणी केली असता प्रेताच्या हातात बांगड्या दिसून आल्याने हे प्रेत महिलेचेच असल्याचे निष्पन्न झाले.

तपास सुरू केल्यानंतर शेताशेजारीच राहणाऱ्या संजय साखरे याची पत्नी मायाबाई ही सकाळ पासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संजय साखरे याला संशया वरून ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणून त्याची सखोल विचारपूस सुरू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पती संजय विरोधात कलम 302, 201 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह बिटरगावचे सपोनि सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित, गणेश राठोड, किसन राठोड, प्रकाश बोंबले, राम गडदे, रुपेश चव्हाण, संदीप ठाकूर, नितीन खवडे, मुन्ना आडे, परशुराम इंगोले आदींनी केली.

तिने नकार देताच पतीने आवळला गळा
मायाबाई व संजय साखरे यांच्यात मागील अनेक दिवसांपासून शारीरिक संबंध नव्हते. गुरुवारी दुपारी ही हे दोघे शेतात काम करीत होते. शेतात कुणीही नसल्याने पती संजयने पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र माया हिने त्यास नकार दिला. पत्नी नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध करीत असल्याने संतापलेल्या पतीने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगडाने तिच्यावर वार केले. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र आरोपीची पाचावर धारण बसली. घाबरलेल्या संजयने मयत पत्नीचे प्रेत शेजारच्या शेतातील सोयाबीनचे कुटाराकडे नेले व कुटारात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

57 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

1 hour ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

8 hours ago