कोयता गैंग शिवाजीनगर पोलीसांकडून जेरबंद

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे :- जंगली महाराज रोडवरील मे. एम. कॉर्नर या खाऊ गल्लीमध्ये दि.०५/०१/२०२३ रोजी दुपारी ०१.३० या सुमारास खाद्य पदार्थ विक्री करणान्या महीले तिथे आलेल्या तत्कालीन झालेल्या वादावरून त्या महीलेवर कोयता उगारून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन त्या परिसरात दहशत निर्माण करून ते टोळके पसार झाले होते व त्याबाबत तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०२/२०२३ भा.द.वि. कलम ५०६ (२), ५०४ १४३. १४७, १४९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४. २५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) आणि क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम २, ७ असा गुन्हा दाखल करण्यात आला.

मा. श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे व श्री. विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास (पथकातील पोलीस अंमलदार यांनी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून टोळक्यातील मुलांची ओळख पटविण्यात आलो. व त्यानंतर त्यांचे ठावठिकाण्याबाबत गोपनीय रित्या माहीती प्राप्त करून, सातत्यपूर्ण तपास करून १) रणजित रघुनाथ रामगुडे, वय २० वर्ष, रा. विठठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी पाषाण पुणे २) रोहन गोरख सरक, वय १९ वर्ष, रा. विठठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी पाषाण पुणे ३) विशाल शंकर सिंह वय १८ वर्ष, रा. ओमकार गणेश मंदिराजवळ, संगमवाडी पुणे ४) आदित्य वडसकर वय १८ वर्ष, रा. संभाजी चौक, युनिक फोटो स्टुडिओ समोर, पाषाण, पुणे आणि दोन विधोसंघर्षितीत बालके यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.

सदर आरोपी यांचे कडुन गुन्हयात वापरलेले चार लोखंडी कोयते आणि गुन्हयात वापरलेल्या चार दुचाकी गाड्या असा एकूण १,२५,०००/- किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवून शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. सन्दीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-० १, पुणे शहर, मा. सतीश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गोड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत बाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, दिलीप नांगरे यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

59 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

2 hours ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

8 hours ago