पंकेश जधव पुणे ब्यूरो चीफ
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- अटक करण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश फिर्यादी श्री. कुलदीप नारायण कदम वय ३६ वर्षे, रा. शनिवार पेठ पुणे यांचे कंपनीचे ऑफिस शिवाजीनगर, पुणे असून सदर ऑफिसमध्ये यातील आरोपी मुकुल राहणार मुंबई नावाचे प्रमुख सुत्रधाराने त्याच्या बिटकॉईन विक्री करणारे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सुजॉय पॉल, रा. हांडेवाडी रोड, पुणे गणेश कदम, स्नेह सागर सोसा गोखलेनगर, पुणे यांना पाठवले. सदर ठिकाणी बिटकॉईन चे व्यवहारामध्ये मुकुल याचे सांगण्यावरून त्यांनी मिटींग घेवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस प्रथम ३ बीटकॉईन देतो असे सांगून फिर्यादीस आरोपी शब्बीर शेख याने साथीदार रंजित जरनैल सिंह याचे आयसीआयसीआय खाते बैंक खात्यावर १९७०८८६/- रु भरण्यास भाग पाडले. परंतु फिर्यादीस त्यावेळी बिटकॉइन दिले नाही. फिर्यादी यांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व फसवणूक झालेने अशा आशयाचे तक्रारीवरून शिवाजीनगर पो.स्टे. ४३ / २०२२ मा. दं. वि. कलम ४१९, ४२०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा आरोपी नामे १) प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल, वय ३४ वर्षे सध्या रा. डी/१४ व मिस्ट इंदीरानगर, दहीवली ता. कर्जत, जि. रायगड, २) रंजित जरनैल सिंह, वय ३७ वर्षे धंदा व्यवसाय, रा. हेनिटेज शंगनिला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नीरा रोड, पु. भाईंदर ठाणे, ३) शब्बीर शेख वय ४१ वर्षे, धंदा-व्यवसाय रा. ए विंग, निर्मलनगर ५०२. सन थॉमस चर्चसमोर, मीरा रोड पु. ४) सुजॉय पॉल, रा. हांडेवाडी रोड, पुणे, ५) गंगेश कदम, स्नेह सागर सोसा. गोखलेनगर, पुणे यांचेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हया मध्ये मुकुल हा बिटकॉईन विक्री करण्याच्या व्यवहारामध्ये प्रमुख सुत्रधार असून तो नाव व मोबाईल बदलून तसेच राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत होता. सदर आरोपीचा कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना आरोपीस पोलीस अमलदार आदेश चलवादी यांनी तात्रिक मदतीच्या आधारे आरोपीचे छायाचित्र प्राप्त करून व आरोपीचा सुगावा लागल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तात्काळ सायबर पथकातील सहा पोलीस बाजीराव नाईक व सोबत स्टाफ रूपेश वाघमारे, आदेश चलवादी यांचे पथक रवाना केले. सदर पथकाने आरोपीचे वावर असलेले ठिकाणी यशस्वी सापळा रचुन आरोपी ताब्यात घेवून आरोपीस पोलीस असल्याचे ओळख पटवून त्यास केलेले कृत्याचे माहिती देवून आरोपीने सदर फसवणूक केल्याचे कबुल केल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतलेले आहे सदरणा गुन्हा मार्च २०२२ मध्ये दाखल झालेपासून त्याचा शोध सुरु होता. उपलब्ध माहीतीये, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडुन तपास करून दि.६/०१/२३ कर्जत जि. रायगड येथून मुख्य सुत्रधार मुकुल यास ताब्यात घेतले असता त्याचे नाव व पत्ता प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल वय ३४ वर्षे सध्या रा. डी / १४, द मिस्ट, इंदीरानगर, दहीवली ता. कर्जत, जि.रायगड असे असल्याचे निष्पन्न केले. तपासामध्ये त्याचे घराची झडती घेतली असता सदर गुन्हातील खालील मुद्देमाल मिळुन आला आहे.
१) एकुण ७ मोबाईल व १० सिम कार्ड.२) वेगवेगळ्या बँकांचे १८ बैंक खात्याचे पासबुक *३) वेगवेगळ्या बँकांचे ८ डेबिट कार्ड.
४) एक क्यू आर कोड.
सदर अटक आरोपी मुकुल याने आणखी अशा प्रकारे बिटकॉईनचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक
केली आहे काय याचा शोध शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत आहे. सदर गुन्हयामध्ये त्याचा साथीदार शमीर हदीश शेख वय ४५ वर्ष रा. निर्मलनगर सन थॉमस चर्चेसमोर, मीरा रोज पु यासही अटक करण्यात आली असुन इतर साथीदाराचा शोध चालू आहे. अशाप्रकारे सदर आरोपींताकडून नागरीकाधी फसवणूक झाली असल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर गुन्हयातील कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. सतिश गोवेकर, सपोआ फरासखाना विभाग (अतिरिक्त कार्यभार विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सायबर पथकाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रूपेश वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमवाडे यांनी केली आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…