पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे:- वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील स्टाफ वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार अमजद पठाण व संतोष नाईक यांना संयुक्तीकरित्या गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीवरुन वानवडी पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गुफ्या ऊर्फ गुफरान ऊर्फ मतीन खान, रा. गल्ली नं. १५ ए. गुलाबी बिल्डींग, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथे संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे खालीलप्रमाणे वस्तु मिळून आल्या.
१) अंदाजे ४०,०००/-रु. किं. चे गावठी बनावटीचे पिस्टल २) अंदाजे ४,००/-रु. किं. ची दोन जिवंत काडतुसे ३) अंदाजे १०,०००/- रु. किं. चा मोबाईल हॅन्डसेट
सदरचे पिस्टल व राऊंड हे त्याने कोणाचेही अधिकृत परवान्याशिवाय जवळ बाळगल्याने त्याचेवर वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०२ / २०२३ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. नमुद अटक आरोपी याचेवर यापूर्वी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट या सारखे गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अजय- भोसले हे स्वतः करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, पुणे शहर, श्री.विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती पौर्णिमा तायरे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर व संदिप शिवले अतिरीक्त कार्यभार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव,पोलीस उप निरिक्षक अजय भोसले व पोलीस अमलदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर,महेश गाढवे, राहुल गोसावी, निळकंठ राठोड यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…