विज कर्मचारी संपाला समर्थन द्या, खबरदारी घ्या: सिद्धार्थ सुमन, नागपुर प्रदेश सरचिटणीस आरपीआय

युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विजेवर अवलंबुन असणाऱ्या बाबींची आगावु तजविज करुन ठेवा. पाणी अधिकचे पाणी साठवुन ठेवा. मोबाईल चार्जींग करुन ठेवा. वापर कमी करा. हा संप विज निर्मीती खाजगी मालकाच्या घशात जावु नये या साठी आहे.

आज अनेक सार्वजनिक संस्था खाजगी मालकाच्या ताब्यात देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याप्रमाणे सरकार निर्णय घेत आहे. या धोरणाचा जबर फटका हा मध्यमवर्गीय तथा गोर गरीबांनाच बसत आहे, बसणार आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असु दे. LPG अर्थात लिब्रलायजेशन, प्रावेटायजेशन आणी ग्लोबलायजेशनचे आर्थिक धोरण हे सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचे ठरु शकत नाही. या धोरणाने समाजवादी लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा बट्याबोळ झाला आहे. LPG चे धोरण भांडवलवादी वा साम्राज्यवादी अर्थव्यवस्था निर्माण करणारे धोरण आहे. ज्यात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची पिळवणुक होत असते. या शोषणाच्या विरुध्द असणारा असंतोष दडपण्या करीता बहुसंख्यांक जनतेस धर्माच्या विळख्यात जखडुन ठेवाण्यात येते जेणे करुन असंतोषास वाचा फुटु नये. Exploitation is the pregnancy of revolution & unsatisfactio is birth of revolution हे क्रांतीचे सुत्र आहे. या सुत्राला निष्प्रभावी करण्याचे अचुक अस्त्र म्हणजे धर्माची वापर जो पध्दतशीर पणे करण्यात येतो.

मागील काही वर्षात आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सामान्य तथा गोरगरीब जनतेच्या दैनंदिन जीवन जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. महागाई, बेरोजागारी मुळे जनतेचे हाल होत आहेत. पण सुनियोजीत पणे या प्रश्नाकडुन लक्ष विचलीत करण्यासाठी विवीध हाथकंडे वापरण्यात येत आहेत. जाती धर्माचा वापर होतच आहे. आता महापुरुषांचा अपमान करणारी विधाने करायची व त्यात गुरफटुन ठेवायचे असे सगळे सुरु आहे.

तेव्हा विद्युत कर्मचाऱ्यांच्याच संपास नव्हे तर अशाच प्रकाराच्या सर्वच आंदोलनांना ज्या आंदोलनाचा संबंध लोक कल्याणकारी व समाजवादी व्यवस्थेच्या रक्षणासाठी आहेत. सर्व जनतेने पुरजोर समर्थन केले पाहीजे. तरच आपल्या देशात लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी व्यवस्था टिकवून ठेवता येईल अन्यथा या व्यवस्थेचेच्या जागी हुकुमशाही धर्मांध भांडवलवादी व्यवस्था येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आजच जागृत व्हा ! खबरदारी घ्या. असे मत सिद्धार्थ सुमन, नागपुर प्रदेश सरचिटणीस रिपब्लीकन पार्टी आॕफ इंडिया यांनी व्यक्त केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

6 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

6 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

6 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

6 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

6 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

6 hours ago