✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करून सातासमुद्रा पलिकडे देशाचे नाव गौरवान्वित करणारे सुरमणी पंडित प्रभाकर धाकडे गुरूजी यांच आज दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. 74 व्या वर्षी पंडित प्रभाकर धाकडे यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांचं आज दिनांक 07 जानेवारी सायंकाळी 6.30 वाजता वयाच्या 74 व्या वर्षी नागपूर येथे दुःखद निधन झालं. पंडित प्रभाकर धाकडे यांच्या दुःखद निधनाच्या बातमीने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या उत्कर्ष निर्माण सदर नागपूर येथील राहत्या घरून निघेल आणि अंत्यसंस्कार मोक्षधाम घाट रोड नागपूर येथे करण्यात येणार अशी माहिती प्राप्त झाली आहे.
संगीत सुरमणी पंडित प्रभाकर धाकडे गुरूजी यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व राज्य सरकारने सुरू केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समताभूषण गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पहिल्याच वर्षी या पुरस्काराचे मानकरी म्हणून त्यांची राज्य सरकार तर्फे पंडित प्रभाकर धाकडे यांची निवड केली होती. तसेच, ऑल इंडिया रेडिओ, प्रसार भारती भारत सरकारतर्फे वायोलीन वादनातील सर्वोच अशी टॉप’ श्रेणी मिळाली होती. अशी श्रेणी मिळवणारे देशातील मोजकेच कलाकार आहे.
देशातील मोजक्या संगीत तज्ज्ञांना आकाशवाणी तर्फे ‘ए टॉप’ ही श्रेणी दिल्या जाते. देशातील अगदी मोजक्या कलावंतांच्या यादीत पंडित प्रभाकर धाकडे यांचा समावेश होता. देशात अशी श्रेणी प्राप्त करणारे फारच कमी संगीततज्ज्ञ आहेत. ते स्वत: अनेक वर्षे आकाशवाणीत ज्येष्ठ वायोलीन वादक म्हणून कार्यरत होते. देशात व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. त्यांनी भावगीत, गझल, लोकगीत, बुध्द भीम गीत आदी इतरही स्वरूपातील हजारो गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. त्यांचे बुध्द भीम गीताला संगीत बद्करून भीम चळवळीला नवीन आयाम दिला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…