प्रतिबंधित ई-सिगारेट विक्रेत्यांवर Unit-2 कडून एकाचवेळी 9 ठिकाणी छापा कारवाई, एकूण 10,52,000/- ₹ किमतीचा ई-सिगारेट साठा हस्तगत. पुणे आयुक्तालय हद्दीत प्रथमच अशा प्रकारची मोठी कारवाई

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर


पुणे :- दिवसेंदिवस पुणे शहरात शाळा/कॉलेज मधील विद्यार्थी त्याचप्रमाणे तरुण वर्गास छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित ई-सिगरेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री रामनाथ पोकळे यांनी Unit-2 प्रभारी व.पो.नि. मा. क्रांतिकुमार पाटील सो याना आशा ई- सिगारेट विक्रेत्यांची सविस्तर गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली API विशाल मोहिते यांचे दिमतीत Unit-2 कडील पथकाने लष्कर, कोरेगाव पार्क, भारती विद्यापीठ पो.स्टे. हद्दीत एकाचवेळी 9 ठिकाणी छापा टाकून एकूण 10,52,000 ₹ किमतीचा प्रतिबंधित ई-सिगारेट साठा जप्त करून अशा विक्रेत्यांवर तंबाखूजन्य उत्पादणे (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादक, पुरवठा व वितरण विनिमय) अधिनियम सन 2003 चे कलम 6(ब), 24 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
पुणे शहरात प्रथमच ई- सिगारेट विरुद्ध अशी एकाचवेळी धडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

*सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री रामदास पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे, Unit-2, प्रभारी पो.नि. श्री क्रांतिकुमार पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल मोहिते, पो अंमलदार  संजय जाधव, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, निखिल जाधव, गजानन सोनुने, कादिर शेख, समीर पटेल, विनोद कोकणे, गणेश थोरात, उत्तम तारू, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.*
पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

3 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

5 hours ago