पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट-४ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- येरवडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०१/०१/२०१३ रोजी रोडवर गुंजन चौक बस स्टॉपचेजवळ, मेरवडा, पुणे येथुन फिर्यादी त्यांचे मित्रासोबत जात असताना काही मुले गोंधळ करीत असल्याने फियादी व त्यांचा मित्र तेथे थांबले गोंधळ करीत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडे पैसे मागुन एकाने खिसे तपासले. परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ केली व दुस-या अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या पोटाच्या डावे बाजुस चाकु खुपसून गंभीर जखमी करून लुटन्याचा प्रयत्न करुन त्यांना गंभीर दुखापत केली. म्हणून दोन अनोळखी इसमांचे विरुध्द येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ५/२०२३ मा. द. वि. कलम ३९७, ५०४. ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
त्यामुळे आरोपीतांना तात्काळ अटक करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेश दिन होते नमुद गुन्हयातील अनोळखी ओपताचे बाबत युनिट-४ कडील पोलीस स्टाफने तपास सुरू केला. युनिट-४ कडील पोलीस स्टाफने यातिल साक्षीदार व इतर बातमीदार यांचेकडे तपास करीत असताना पोलीस हवालदार हरीष मोरे व पोलीस नाईक नागेश कुँवर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एका इसमाने एकाला चाकु गारल्या बाबतखात्रीशिर बातगी मिळाली त्याप्रमाणे गांधीनगर झोपडपट्टीत राहणारे अशोक वाल्हेकर व तुषार कदम यांनी गुंजन चौक बस स्टॉप जवळ येरवडा, पुणे येथे तपास पथकाने त्यांचे बाबत अधिक माहिती घेतली असता तुषार कदम हा त्याचे गावी चिपळुन, जि. रत्नागिरी येथे पळुन गेला असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलीस अंमलदार हरीष मोरे, सारस साळवी, रमेश राठोड यांनी तात्काळ खाजगी गाडीने रत्नागिरी येथे बातमीच्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन आरोपीना तुषार ऊर्फ तुका तुकाराम कदम, वय २२ वर्षे, रा.स.नं. १०३. गांधीनगर झोपडपट्टी, नगर रोड, येरवडा, पुणे यास शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीने त्याचा साथीदार याचे साथीने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ कडील पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी, प्रविण भालचिम रमेश राठोड यांनी केली आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…