पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे :- दि.०५/०१/२०२३ रोजी पुणे संगमवाडी येथील संगमवाडी बिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम २(क), २(क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या करीत असुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन विष्णु जाधव वय ३२ वर्षे, रा. राजुगांधी नगर वसाहत, बालगुडे यांचे बिल्डींग समोर संगमवाडी पुणे. हा सहा महिन्यापुर्वी मोक्यामधुन जामीनावर सुटला असल्याचे समजले तसेच आरोपी नामे अफजल इमाम नदाफ वय २६ वर्षे, रा. नई जिंदगी गल्ली सितारा चौक, सी.पी. ऑफिस जवळ, सोलापुर याने त्यांचकडे मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, मुंबई येथील एका महिलेने त्यास विक्री करण्याकरता दिला असल्याचे तपासात निषन झाल्याने व सदरची महिला हि सांताक्रुज मुंबई येथे राहत असल्याची खबर पोलीस अंमलदार मारुती पारधी व पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके यांना मिळाली.
सदर बाबत पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना माहिती दिली असता लागलीच नमुद महिलेस ताब्यात घेणे बाबत आदेश दिले. दिलेल्या आदेशाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे यांनी स्टाफसह सांताक्रुज मुंबई या परिसरात सदर महिलेचा शोध घेवुन अत्यंत शिताफीन तिला ताब्यात घेतले असता सदरच्या महिलेचे नाव जेलुखा मोहम्मद हुसैन कुरेशी ऊर्फ जुलैखाबी ऊर्फ जिल्लो वय ४० वर्षे, रा. टि १७, सय्यद अलीव्ह, प्रभात कॉलनी लेन नं.९, सांताक्रुझ (ईस्ट) अंधेरी, असे असुन ती रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगार असल्याचे तसेच तिचे विरूध्द अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांनी गुरनं ६९३ / २०१४ एनडीपीएस कलम ८ (क), २० ( ब ) २०६/२०१२ एनडीपीएस कलम ८ (क), २१, असे गुन्हे नोंद असुन खडक पोलीस ठाणे पुणे शहर गुरनं ४९२ / २०१७ एनडीपीएस कलम ८ (क) २१ (ब). २९ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंद कायदा या गुन्हयात ती ५ वर्षापासुन पाहिजे असल्याचे समजले.
सदर महिलेस येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ११ / २०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ मध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी क्र. १ ते ३ यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी पर्यंत पोलीस करटडी रिमांड दिली असुन पुढील तपास सुरु आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्मिक मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहा पो] आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगले, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, सचिन माळ, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…