पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दि.०५/०१/२०२३ रोजी घोरपडी गाव, वानवडी, पुणे परीसरात पत्र्याच्या शेड मध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २१ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,२२,८१०/- रू किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा २२ इसमांविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं.०७/२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंगलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…