पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- दि. २७.११.२०२२ रोजी पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे ८ ते ९ साथीदार हे आकाशनगर, जुना जकात नाका, वारजे पुणे येथील फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी फिर्यादीच्या गावासोबत झालेला जुना वाद उकरून काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने मोठा दगड फिर्यादीच्या दिशेने मारलेला दगड त्यांनी चुकवला, त्याचा राग येवून पप्या उर्फ वैभव उकरे याने तोच दगड फिर्यादीच्या मोटार सायकलवर परत मारून मोटारसायकलचे नुकसान केले. तसेच पप्या उर्फ वैगव याचेबरोबर असलेल्या ८ ते ९ साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवला व त्यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून “पप्पुभाई हा इथला भाई आहे” असे म्हणुन “पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन” असे म्हणून परिसरात दहशत पसरविली व आरडा-ओरडा करत तेथून निघून गेले. वैभव उकरे उर्फ पप्या तसेच त्याचे सोबत असणारे साथीदारांविरोधात फिर्यादीने कायदेशिर तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो स्टे ४७०/२०२२ मादवि कलम ३०७,४२७,३३६, ३३७, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५). म.पो.का.क ३७
(१) (३)/१३५.क्रि. लॉ.अमे. अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे १) वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे, वय २४ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिरामागे, वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे २) आशितोष नारायण साठे, वय १९ वर्षे, रा. मु.पो.कुळे, ता. मुळशी, जि. पुणे सध्या घर नं. ३. चायनिज बिल्डींग, तीसरा मजला, कर्वेनगर, पुणे ३) गणेश उत्तम माने, वय २२ वर्षे, रा. विश्व कॉलनी, आकाशनगर, वारजे, पुणे यांना अटक करण्यात आली असून ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. तसेच विधिसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.
वरील नमुद अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे हा (टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री. डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांनी मा. श्री. सुहेल शर्मा पोलीस उप आयुक्त परि-३, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…