आ. सरनाईक आणि रहिवाश्यांनी केलेल्या आंदोलनामुळे समतानगर चौक समोरील वळण रस्ता अखेर सुरू

अधिकार्यांच्या चुकीच्या भुमिकेतून नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे अखेर आमदार प्रताप सरनाईक यांना करावे लागले आंदोलन!

✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- गेल्या काही दिवसांपूर्वी पोखरण रोड नं. १ समतानगर येथील चौकासमोरील वळण रस्ता वाहतुक विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या माध्यमातून बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होता. आज दि. ७ जानेवारी, २०२३ रोजी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी आंदोलन करून सदरहू वळण रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटविण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना रहदारीचा त्रास होऊ नये याकरिता पोखरण रोड नं. १ हा रस्ता तात्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्याकाळात रूंदीकरण करण्यात आला होता. सदरहू रस्ता बनविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:ची मालकी हक्क असलेली घरे दिलेली असून ठाणे शहरातील सर्वात जास्त रूंदीकरणाचा रस्ता म्हणून ओळखण्यात येतो.

मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अड़थळा होत असल्यामुळे पोलिस वाहतुक विभागाच्या अधिकार्यांनी समतानगर चौकासमोरील वळण रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. जर रहदारीचा प्रश्न उद्भवत असेल तर वाहतुक विभागाच्या अधिकार्यांनी रेमंड कंपनी समोरील जाणारा रस्ता सोडला, सिंघानिया शाळेला जाणारा सोडला पण समतानगर चौकासमोरील वळण रस्त्यावरून लाखों लोकांची वर्दळ होत असून समतानगर मधील स्थानिक नागरिकांचा त्यासाठी विरोध असताना देखील ’सदरहू वळण रस्ता का बंद करण्यात आला?“ असा आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनास जाब विचारण्यात आला.

समतानगरमधील १८ मीटर रस्ता पुढे लुईसवाडीला जावून मिळतो त्यामुळे तेथे वाहतुक वर्दळ जास्त असते. बाजूला असलेल्या रेमंड कंपनी व सिंघानिया शाळेला झुकते माप देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी व वाहतुक पोलिस यांच्या संगनमताने स्थानिक नागरिक व माजी नगरसेवक यांना विश्वासात न घेता असा तुघलघी निर्णय घेण्यात आला. “स्थानिक नागरिकांकरिता मला रस्तावर उतरून आंदोलन करावे लागले तरी त्याकरिता माझी तयारी आहे” असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून राज्य शासना कडून तांत्रीक अड़चणीमुळे महानगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यामुळे सद्या महापालिकांवर प्रशासकिय राजवट असून महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या अभावामुळे महापालिकेच्या अधिकार्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक आमदार म्हणून काळे कपडे घालून प्रशासनाच्या या वृत्तीचा मी निषेध करीत आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेचे अधिकारी श्री. ढोले यांना बोलावून समातनगर चौकासमोरील डिव्हाडर मधील रस्ता तात्काळ पुर्ववत करून तेथे सिग्नल यंत्रणा बसविण्यासंदर्भात संबंधित विभागास आमदार प्रताप सरनाईक यांनी सुचना दिल्या.

या आंदोलनामध्ये विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपविभागप्रमुख संतोष ढमाले, संदिप डोंगरे, भगवान देवकते, चंद्रशेख एंगडे, महेश लोखंडे, नंदकुमार पिसाळ, राकेश यादव, सुनिल शिंदे, बाळू जाधव, राकेश शिंदे, किरण भुजबळ, महेश शिंदे, विराज निकम, सुशांत मयेकर, देवेंद्र साळवी, विनय बांबर्डेकर, निलेश चव्हाण, तसेच बाळासाहेबांची शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

11 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

11 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

11 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

11 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

12 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

12 hours ago