पुणे: भारत पे स्कीममध्ये व्यवहाराच्या नावावर पुण्यातील अनेक व्यावसायिकाची फसवणुक.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पुणे:-
येथून काही व्यावसायिकाची फसवणुक झाल्याची घटना घडली येत आहे. भारत पे स्कीममध्ये दर महिन्याला एक कोटी रुपयांचा व्यवहार (ट्रान्झॅक्शन) केल्यास एक तोळा सोने देण्याचे आमिष दाखवून काही व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी येथील व्यावसायिकाने वय 28 वर्ष बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन अनिल गादेकर वय 27 वर्ष, रा. टिळेकरनगर, कोंढवा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जून 2022 पासून आतापर्यंत घडला आहे. आरोपीने बऱ्याच व्यावसायिकांची फसवणूक केली असून, त्यापैकी चार व्यावसायिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

फिर्यादी यांचा अप्पर इंदिरानगर येथे व्यवसाय आहे. आरोपीने फिर्यादीला भारत पे स्कीममध्ये महिन्याला एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केल्यास एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून 9 लाख 9 हजार रुपये घेतले. अशाच प्रकारे त्याने आणखी तिघांना आमिष दाखवून त्यांच्याकडून काही लाख रुपये घेतले. परंतु त्यांना एक रुपया न देता त्यांची फसवणूक केली.

आज ऑनलाईन आणि अशा स्कीम मध्ये गुंवणूक करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहे. महाराष्ट्र संदेश न्युज अशा सर्व नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अमिषाला बळी पडून आपली हक्काची कमाई चोरट्याचा हवाली करू नका. आणि ऑनलाईन OTP कुणाला सेअर करू नये.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

5 hours ago