✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- विधिमंडळाच्या कामकाजाच्या वेळी विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशनात मी आणि आमदार श्रीकांत भारतीय यांनी अनाथ त्याचबरोबर पीडित बालकांचे वसतिगृह आणि महाराष्ट्रातील अनेक सुधारगृहांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या विषयासंदर्भात प्रामुख्याने भूमिका मांडत असताना संबंधित खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना या असलेल्या विषयाबाबत अतिक्रमण, सोयी सुविधा, अडी – अडचणी, विद्यार्थ्यांना रस्ता किंवा सुविधा देणे, त्रुटी दूर करणे, शासन नियंत्रण असणे, असे अनेक प्रश्न विचारले होते.
यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे लगेचच बैठक आयोजित केली होती. विधान परिषदेमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली. याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बैठकीत स्थानिक परिस्थितीवर आधारित सोयीसुविधा अडी- अडचणी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत काय करता येईल याबाबत चर्चा केली. ही चर्चा करत असताना या मुलांचे दहावीपर्यंत शिक्षण बारावीपर्यंत करावे, अशी सूचना केली.
शासनाच्या नियंत्रणाखाली हे काम करत असताना आयटीआय किंवा मोठ्या कंपन्यांशी संलग्न चर्चा करून भविष्यकाळात स्वतःच्या पाया उभे राहण्यासाठी नियोजन करावे, अशा विविध विषयासंदर्भात चर्चा झाली. याबाबत सविस्तर आढावा घेऊन कामाचा निधी वितरित करण्यात येईल असे मंत्री या नात्याने त्यांनी मान्य केले.
महिनाभरानंतर परत आढावा बैठक घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. खरं म्हटलं तर राजकारणात काम करत असताना अधिकार प्राप्त होत असतो. हा अधिकाराचा उपयोग अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणासाठी, विकासासाठी करता येतो ; परंतु या अधिकाराच्या माध्यमातून अनाथ गरीब मुलांचा विषय मांडत असताना एक वेगळ्या प्रकारचे काम केल्याचे समाधान वाटते. जो आपल्याला आमदार म्हणून अधिकार मिळतो त्या अधिकाराचा वापर चांगल्या आणि समाजहित जपणाऱ्या कामासाठी मी कायमच करत असतो.
उपेक्षित वर्गातील लोकांना न्याय मिळवून देत असताना आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतरी आहे किंवा कोणीतरी याचा विषय गांभीर्याने घेत आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन सावंत यांनी हा कार्यक्रम घेतला होता. तो तिथे शिकून मोठा झाला. त्यांनी हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेत असताना सांगितल्यानंतर यामध्ये प्राधान्याने तो विषय मार्गी लावण्याचे त्यांना मी आश्वासन दिले. त्या कामाचा एक वेगळाच आनंद, एक सेवा म्हणून समाधान आमदारकीच्या अधिकारातून मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…