पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट-४ पुणे शहर
पुणे :- मा. न्यायालयाने मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. तरी सुद्धा पुणे शहरातील काही व्यापारी बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करतात. बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण होवु नये या उद्देशाने मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरामध्ये बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करणा-या व्यापा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
गा. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशास अनुसरुन श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर यांनी त्यांचे अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करणा-या व्यापा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि ०७/०१/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहर कडील पथकाने गोपनिय माहिती प्राप्तकरुन शिवाजी पुतळा, जुना बाजार, खडकी, पुणे येथील तांबोळी जनरल स्टोअर येथे छापा कारवाई करुन मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण करणारा बंदी असलेला नायलॉन मांजाचा साठा पकडला आहे. तांबोळी जनरल स्टोअरचे मालक आदिप अब्दुल करीम तांबोळी रा. १९२ जुना बाजार, खडकी, पुणे याचे विरुद्ध पोलीस ठाणे खडकी येथे भा. द. वि. कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही गा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, सहा पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार विनोद महाजन. स्वप्निल कांबळे, वैशाली माकडी यांनी केली आहे.