पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- खुनाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सोन्या उर्फ महेश मिसाळ आणि त्यांचे साथीदार याची निर्दोष सुटका पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे.
सोन्या उर्फ महेश मिसाळ आणि त्यांचा साथीदारानी मिळून पूर्ववैमनस्यातून एकावर धारधार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आल्याचा आरोप होता. पण, सबळ पुराव्याअभावी व साक्षिदारांतील विसंगतीमुळे संशयित आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली.
पुणे येथील कोंढवा पोलीस स्टेशनचा हद्दीत एक मृतदेह मिळाला होता. याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. यानुसार खून व बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून खून कोंढवा परिसरात असलेले संशयित आरोपी सोन्या उर्फ महेश मिसाळ व त्यांच्या साथीदाराची भा. द. वि कलम ३०२, सह ३४, भा. शस्त्र कायदा ४(२५), म.पो.अ.३७(३) सह १३५ विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या गुन्हाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. त्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज निकाल दिला.
पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यापुढे दाव्याची सुनावणी झाली. साक्षिदारांतील विसंगतीमुळे संशयितांची निर्दोष सुटका झाली. सरकार पक्षातर्फे अनेक जणांची साक्ष, कागदपत्रे व मुद्देमाल तपासण्यात आले होते. मात्र, सबळ पुरावा आणि साक्षिदारांतील विसंगतीमुळे संशयितांची निर्दोष मुक्तता झाली आहे. संशयित आरोपीतर्फे वकील ॲड. शुभम लोखंडे, अरविंद धकाते ॲड. शैलेश बेरे पाटील यांचा युक्तिवाद कोर्टाने समजावून संशयित आरोपी यांना निर्दोष सोडण्याचा हुकूम जारी केला.