पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट-५ पुणे शहर
पुणे :- कोंढवा येथील न्याती व्हिटोरिया या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ख्रिसमसच्या पूर्व संध्येला सर्व कुटूंबिय ख्रिसमस साजरा करण्यासाठी रात्री ०९.०० वा. सुमारास चर्च मध्ये गेले होते. ते रात्री १२.३० वा. सुमारास घरी आले असता त्यांचे राहते घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरुमध्ये गेले असता तेथील कपाट उघडे व कपडे अस्थाव्यस्त पडल्याचे दिसले व घरातील सोन्या-चांदीचे दागिने, डायमंडचे नेकलेस, मौल्यवान घडयाळ असा लाखोंचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले. सदरप्रकरणी फिर्यादी श्रीमती बबीता सिरीन रोलेंड डिसोझा यांनी कोंढवा पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झालेला होता..
ऐन ख्रिसमस सणाच्या दिवशी धाडसी घरफोडी झाल्याने गुन्हयाचे घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. तसेच नमुद गुन्हयाचा समांतर तपास मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-5 करीत होती. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोंढवा परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर पिंजुन काढुन गुन्हयाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सी. सी.टि.की. द्वारे घटनास्थळाचे दिशेने येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व व्यक्ती व वाहने तपासण्यात आली. सदर वाहनाचा तपास करीत असताना एक संशईत ज्युपीटर गाडीवर एक इसम बसुन गुन्हा घडला त्या सोसायटीच्या मागील बाजुस जाताना व पुन्हा परत जाताना आढळुन आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट-5 कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गाडी ज्या दिशेनी आली. आणि परत गेल तो संपुर्ण रुट काढला असता एक सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यामध्ये ज्युपीटर गाडीवर असलेल्या विशिष्ट स्टीकरवरुन माहिती प्राप्त केली असता ती गाडी रेकॉर्डवरील आरोपी नामे मल्लप्पा साहेबाना होसमानी, रा. आंबेगाव बु. कात्रज, पुणे हा वापरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीसांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पडताळुन पाहली असता त्याचेवर यापुर्वी वाहन चोरीचे गुन्हे अनुक्रमे लोणीकाळभोर, चंदननगर आणि हिंजवडी पोलीस ठाणे येथे नोंद असल्याचे आढळुन •आले. यानंतर गुन्हे शाखा युनिट-५ पथकाचा सदर इसमावर संशय अधिक बळावला. सदर इसमास ताब्यात घेणेकामी कात्रज भागामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम व पथक यांनी सापळा लावुन मल्लामा साहेदान्ना होसमानी, वय ३५ वर्षे यास ताब्यात घेतले.
युनिट कार्यालयात आणुन त्याचेकडे सखोल व कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने कोंढव्यातील सदरची घरफोडी केल्याचे कबुल केले. आरोपीकडे अधिक सखोल तपास केला असता, त्याने सांगितले की, त्याचा आंतरजातिय प्रेमविवाह झाला असल्याने घरातील लोकांनी त्यास घराबाहेर काढुन दिल्यामुळे सदरची चोरी करून आलेल्या पैशात घर घेऊन दुसरीकडे राहण्याचा त्याचा प्लॅन असल्याचे त्याने तपासामध्ये सांगितले. गुन्हयाचे तपासात अटक आरोपी याचेकडुन पोलीसांनी सोन्याचे च हिन्याचे दागिने असा एकुण ३७.३०,२००/-रु.कि.चा ६५.५ तोळे (६५५ ग्रॅम) १०० टक्के असा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणुन गुन्हे शाखा युनिट ५ची उल्लेखनिय कामगिरी
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. श्री. अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, गुन्हे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. श्री. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ५कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे, शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, अकबर शेख, अमित कांबळे, स्वाती गावडे, तृप्ती झगडे व संजयकुमार दळवी यांनी कामगिरी केली आहे.