पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर
पुणे:- दिनांक ०९/०१/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ कडील अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व दत्ता सोनावणे यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, लोहीयानगर परिसरातील एक इसम हा आपले घरात गोळ्या-बिस्कीटांची विक्री करतो त्याचे आड बंदी घालण्यात आलेला पंतग उडविण्याच्या नायलॉन मांजाची अनाधिकाराने विक्री करीत आहे.
अशी माहिती प्राप्त होताच युनिट-१ चे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांचे सुचनांप्रमाणे युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लोहीयानगर परिसरात जावून मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे सोहेल आरीफ शेख रा. इनामकेमळा, लोहीयानगर, पुणे यास ताब्यात घेवून त्याचे रहाते घराची झडती घेता त्यांचे घरामध्ये किं रू १०००/- चा नायलॉन मांजा विक्री करीता ठेवलेला मिळून आल्याने सदरचा मांजा हा जप्त करून सोहेल आरीफ शेख याचे विरूध्द खडक पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम १८८.३३६ पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे कलम ५ १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री अमोल झेंड, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, पो.उप.निरी अजय जाधव, पो. उप निरी रमेश तापकीर पोलीस अंमलदार अमोल पवार, शशिकांत दरेकर यांचे पथकाने केली आहे.