पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १
पुणे :- दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व पथक असे कॉम्बिंग कारवाई करीत असताना पो ना लोखंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भवानी पेठ, पुणे येथे तडीपार आरोपी हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आहे. सदर ठिकाणी जाऊन पथकाने नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता फिरोज मोहमद शेख , वय ३९ वर्षे, रा. कासेवडी, भवानी पेठ, पुणे असे सांगितले. नमूद इसमाने मा. पो. उप आयुक्त यांच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरामध्ये मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध खडक पो स्टे येथे म.पो.अधिनियम १४२ अन्वये गुन्हा दाखल करणे कामी त्यास खडक पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पो उ नि शेख, पो ना लोखंडे, पोना गणेश ढगे,पो ना येडे, पो ना जाधव व पो. अं. बनकर यांनी केली आहे.